About

नमस्कार … 
थोर संत गाडगेबाबा म्हणायचे, की ' तहानलेल्यांना पाणी देणे हाच धर्म'. तर ' भुकेल्यांना आपल्या घासातला घास देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे', असे आपली संस्कृती सांगते. धर्म आणि संस्कृतीचा हाच वारसा जप्नाचा संकल्प आम्ही केला आहे. 

हा संकल्प आहे, मराठवाडयातील दुष्काळग्रस्तांना सढळ हाताने धान्याची भरगोस मदत करण्याचा. निमित्त आहे, मंडळाचे अध्यक्ष आणि 'हिंदू गर्जना प्रतिष्ठान ' चे संस्थापक श्री. धीरज रामचंद्र घाटे यांच्या वाढदिवसाचे. हारतुरे, शाही डामडौल आणि पैशाची नासाडी न करता अत्यंत साधेपणाने ही ' धान्यदान मोहीम ' पार पडणार आहे. कारण आम्ही सामाजिक बांधिलकी जाणतो आणि जपतो सुद्धा. 

तुम्ही फक्त इतकंच करायचं, जास्तीत जास्त धान्य आमच्याकडे आणून द्यायचं. पुणे शहरातून जमलेलं हजारो किलो धान्य बीड जिल्ह्यातील दादेगाव, बीडसांगवी, कडा ता. आष्टी येथील दुष्काळग्रस्त गावकर्याना देण्यात येणार आहे. आपणही या मोहिमेत सहभागी व्हा आणि दुष्काळग्रास्तांचे दु:ख हलके करा… 

आपले मूठभर धान्य … दुष्काळग्रस्तांना पोटभर अन्न … 

तुम्ही फक्त एवढंच करायचं :

* गहू, ज्वारी, तांदूळ हरभरा डाळ यापैकी कोणतेही धान्य जास्तीत जास्त आम्हाला द्या.
* जनावरांसाठी चारा / कडबा मोठया प्रमाणात देता येईल. 
* स्वत: धान्य दान कराच पण तुमची ईमारत, सोसायटी, वाडा, शाळा, महाविद्यालय किंवा ऑफिसमधील मंडळींनाही धान्य दान करण्याचे आवाहन करा. 
* पुणे शहरातील आमच्या संकलन केंद्रांमध्ये स्वत: येउन धान्य द्या किंवा आमच्या कार्यकर्त्याना फोन करून ' धान्यदान रथ ' घरी बोलवा. 
* १५ ते २३ मार्च या दिवसात धान्य संकलन केले जाईल व २३ मार्चला संध्याकाळी समारंभांपूर्वक हे धान्य दुष्काळग्रस्तांना दिले जाईल. 

धान्यदानासाठी संपर्क -

कौस्तुभ शेडगे - 8888004099 विकी क्षीरसागर - 9881676729
अनिल भाम्बुरकर - 9850883289 प्रशांत सुर्वे - 8888215005
आनंद पाटील - 9325346056 पराग बेनगुडे - 9405010495
सुज्ञानेंद्र पंचमुखी - 8421211007 ओंकार कुलकर्णी - 8888826888